लोक वार्ता न्यूज – राज राठोड
पुणे – समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत २५ जून २०२५ रोजी एका बंद घराचे कुलूप तोडून सुमारे ४ लाख ५७ हजार ६९८ रुपये रोख व सोन्याचे दागिने चोरण्यात आले होते. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास करताना पोलिसांनी बारकाईने तपास करून या गुन्ह्याचा छडा लावला.
वरिष्ठांच्या सूचनेनुसार सुरू करण्यात आलेल्या तपासात समर्थ पोलीस ठाणे तसेच पुणे शहर परिसरातील विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज बारकाईने तपासण्यात आले. या तपासाअंती घरफोडी करणाऱ्या तीन सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. अटक आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत:
१) रोहित उर्फ विनायक प्रमोद भोंडे (वय २१, रा. येरवडा)
२) रोहित उर्फ रावण नानाभाऊ लंके (वय २४, रा. विश्रांतवाडी)
३) निखील परशुराम खांडेकर (वय २०, रा. येरवडा)
या आरोपींनी चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यांच्या ताब्यातून १०,००० रुपये रोख, चोरीसाठी वापरलेले वाहन व हत्यार जप्त करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, आरोपी रोहित नानाभाऊ लंके याच्यावर यापूर्वी पोलीस उपायुक्त, परिमंडळ-४ यांच्या आदेशानुसार तडीपारची कारवाई करण्यात आली होती. दिनांक ३ मे २०२४ रोजी मुंबई पोलीस अधिनियम कलम ५६(१)(अ)(ब) नुसार त्याला पुणे शहर, पुणे जिल्हा व पिंपरी-चिंचवड क्षेत्रातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले होते. मात्र, या आदेशाचे उल्लंघन करून आरोपीने पुन्हा शहरात प्रवेश करत घरफोडी केली, हे तपासात निष्पन्न झाले आहे.
या आरोपींच्या पार्श्वभूमीचा मागोवा घेतला असता त्यांच्यावर चोरी, घरफोडी, मारामारी आदी गंभीर स्वरूपाचे एकूण २९ गुन्हे पुणे परिसरात दाखल असल्याचे स्पष्ट झाले आहे. समर्थ पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे
सदरची कामगिरी ही मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे शहर, श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-०१, पुणे शहर, श्री. कृषिकेश रावले, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, फरासखाना विभाग, पुणे शहर. श्रीमती अनुजा देशमाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, समर्थ पोलीस स्टेशन, पुणे शहर श्री. उमेश गित्ते, पोलीस निरीक्षक (गुन्हे), समर्थ पोलीस स्टेशन, पुणे शहर श्री. चेतन मोरे यांचे मार्गदर्शनानुसार तपास पथकातील पोलीस उप-निरीक्षक जालिंदर फडतरे, पोलीस अंमलदार पागार, औचरे, रोहीदास वाघेरे, इम्रान शेख, शिवा कांबळे, अमोल गावडे, शरद घोरपडे, भाग्येश यादव यांनी केली आहे.




















