Homeक्राईमऑनलाईन फसवणूक करणाऱ्या महिलेस ताब्यात घेऊन फिर्यादीची ११लाख ४५हजार रुपये परत मिळवले

ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या महिलेस ताब्यात घेऊन फिर्यादीची ११लाख ४५हजार रुपये परत मिळवले

लोक वार्ता –राज राठोड
पुणे | २२ ऑक्टोबर २०२५ — ऑनलाईन विवाह जाहिरातीच्या माध्यमातून विश्वास संपादन करून तब्बल ११ लाख ४५ हजार ३५० रुपये फसवणूक करणाऱ्या महिलेचा पर्दाफाश करत बिबवेवाडी पोलिसांनी ती रक्कम फिर्यादीस परत मिळवून दिली आहे. सायबर गुन्हे शाखेच्या तांत्रिक विश्लेषणामुळे आरोपी महिला नागपूर येथे निष्पन्न झाली.

फसवणुकीचा प्रकार

दिनांक १८ एप्रिल २०२५ रोजी फिर्यादीने “वर पाहिजे” अशा जाहिरातीवरून दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क केला. आकांक्षा पाटील नावाने बोलणाऱ्या व्यक्तीने दुसऱ्या मोबाईलवर ममता जोशीशी संपर्क करण्यास सांगितले. ममता जोशी नावाने बोलणाऱ्या महिलेने कोल्हापुरात मावस बहिण आजारी असल्याचे सांगून, नंतर स्वतःच्या अपघाताचे कारण देत उपचारासाठी आर्थिक मदतीची विनंती केली.

ती पुण्यात परत आल्यावर पैसे परत करेल, असे आश्वासन देत १८ एप्रिल ते १ जून २०२५ दरम्यान फिर्यादीकडून फोनपे मर्चंट अकाउंटवर रक्कम ट्रान्सफर करून घेतली. एकूण ११,४५,३५० रुपये ऑनलाईन फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले.

फिर्यादीच्या तक्रारीनंतर बिबवेवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार सायबर टीमने तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपी महिला हर्षला राकेश डेंगळे (वय २८, रा. न्यु ओमनगर, हुडकेश्वर, नागपूर) यास शोधून काढले.

तिला नोटीस पाठवून तपासासाठी हजर राहण्यास सांगितले असता ती पोलीस स्टेशनमध्ये हजर झाली. पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. सुरज बेंद्रे यांच्या तपासात तिने गुन्हा केल्याचे मान्य केले. गुन्ह्यात वापरलेले तीन मोबाईल जप्त करण्यात आले असून, फसवणूक केलेली संपूर्ण रक्कम फिर्यादीस परत मिळवून देण्यात आली आहे.

न्यायालयीन प्रक्रिया आणि पुढील तपास:

दि. १५ ऑक्टोबर २०२५ रोजी आरोपी महिलेस चार्जशीटसह न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तिला जामीन मंजूर केला असून, गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री. सुरज बेंद्रे करत आहेत.

गुन्हेगारी सावधगिरीचा इशारा: पुणे पोलिसांचा नागरिकांना सतर्कतेचा संदेश:

पुणे शहरात ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, पुणे पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

🔹 फसवणूक करणाऱ्यांपासून सावध रहा
🔹 अनोळखी लिंक, कॉल किंवा मेसेजवर विश्वास ठेवू नका
🔹 वैयक्तिक माहिती शेअर करताना काळजी घ्या
🔹 संशयास्पद व्यवहारांची तात्काळ पोलिसांना माहिती द्या

पोलिस प्रशासनाकडून नागरिकांना गुन्हेगारी सावधगिरीबाबत जागरूक करण्यासाठी विशेष मोहिम राबवली जात आहे. तुमची सुरक्षा तुमच्या सतर्कतेत आहे — फसवणूक टाळा, सुरक्षित रहा.

सदरची कामगिरी मा.अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ५ पुणे शहर श्री. राजकुमार शिंदे, मा. सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग पुणे शहर श्री. धन्यकुमार गोडसे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बिबवेवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर श्रीमती अश्विनी सातपुते, पोलीस निरीक्षक गुन्हे श्री. सुरज बेंद्रे यांचे सुचनांप्रमाणे पोलीस अंमलदार संतोष जाधव, विशाल जाधव, मेघा गायकवाड व प्रतिक करंजे यांनी केलेली आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वाघोलीत एम.डी. ड्रग्जविक्रीवर पोलिसांचा मोठा घाव; दोन आरोपी अटक : ३१ लाख ६ हजार...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे : वाघोली पोलिसांनी एम.डी. (मॅफेड्रॉन) ड्रग्ज विक्री करणाऱ्या टोळीवर कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून एकूण ३१ लाख...

घरगुती गॅसचा काळाबाजार उघडकीस, काळेपडळ पोलिसांची धडक कारवाई : १०३ गॅस सिलेंडरसह एक जण...

0
लोक वार्ता – राज राठोड  पुणे : काळेपडळ पोलीस ठाणे हद्दीत घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या दुकानावर पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत...

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; बिबवेवाडीत धक्कादायक घटना, पतीसह ७ जणांवर गुन्हा दाखल

0
  लोक वार्ता – राज राठोड पुणे : बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सासरच्या छळाला कंटाळून एका विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी...

पुण्यात परिमंडळ-१ मध्ये पोलिसांची धडक तपासणी मोहीम, ब्लॅक स्पॉट, मोकळी मैदाने आणि सार्वजनिक ठिकाणांवर...

0
  लोक वार्ता – राज राठोड पुणे : शहरातील सार्वजनिक सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी परिमंडळ-१ अंतर्गत पोलिसांनी मोठी तपासणी मोहीम राबवत अवैध प्रकारांवर अंकुश आणण्यासाठी ही मोहीम दि. १०...

खोट्या गुन्ह्याचा धाक दाखवून ७ लाखांची खंडणी; पोलीस उपनिरीक्षकासह तिघांवर गुन्हा

0
  लोक वार्ता – राज राठोड पुणे : नामांकित शैक्षणिक संस्थेच्या प्राचार्यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची भीती दाखवून ७ लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला...

error: Content is protected !!