Homeक्राईमकाळेपडळ तपास पथकाची कारवाई; लग्नमंडपाच्या कामाचे पैसे लंपास करणारा ड्रायव्हर मुंबईतून अटक,

काळेपडळ तपास पथकाची कारवाई; लग्नमंडपाच्या कामाचे पैसे लंपास करणारा ड्रायव्हर मुंबईतून अटक,

लोक वार्ता न्यूज – राज राठोड.

पुणे : काळेपडळ पोलिस तपास पथकाने धडाकेबाज आणि कौशल्यपूर्ण कारवाई करत, मालकाच्या लग्नमंडपाच्या कामासाठी ठेवलेली मोठी रोख रक्कम चोरी करणाऱ्या चालकास अटक करून तब्बल १५लाख,६,हजार,४२० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

आरोपीचे नाव: सलमान यासीन पठाण (वय ३२, रा. ईसा हाईट्स, खान कंपाऊंड, डावेगाव, ठाणे; मूळ गाव –पाली, बीड) तो फिर्यादीकडे ड्रायव्हर म्हणून काम करत होता. मालकाने मजुरांच्या पगारासाठी गाडीत ठेवलेली मोठी रक्कम त्याने संधी साधून चोरी केली व फरार झाला.

गुन्हा घडल्यानंतर आरोपीने आपले मोबाईल बंद ठेवत सातत्याने ठिकाणं बदलली. सांगली, बीड, पुणे ग्रामीण, मुंबई, मुंब्रा अशा भागांत सतत भ्रमण करून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. तो स्वतःचा मोबाईल न वापरता इतर अनोळखी व्यक्तींकडून मोबाईल घेऊन नातेवाईकांशी संपर्क करत असल्यामुळे त्याचा मागोवा घेणे कठीण झाले होते.

परंतु आरोपीने एकदा चुकून स्वतःच्या जुन्या क्रमांकावरून आपल्या नातेवाईकांना फोन केला. याच एका कॉलचा धागा पकडत पोलीस हवालदार प्रतिक लाहिगुडे यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या साहाय्याने आरोपीचा अचूक ठावठिकाणा शोधून काढला.

तपास पथकातील अधिकारी: सपोनि अमित शेटे, पोहवा. दाऊद सय्यद, पो. अमलदार शाहिद शेख, प्रदीप बेडीस्कर, या पथकाने शिळडायघर पोलीस ठाणे, मुंब्रा परिसरात आरोपीस अटक केली. आरोपीकडून खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला:

रोख रक्कम, सोन्याचे दागिने, चारचाकी वाहन, मोबाईल फोन, एकूण किंमत: १५लाख,६,हजार ४२०/- रुपये

या कारवाईमुळे पुणे शहर पोलिसांच्या तपास कौशल्याची पुन्हा एकदा प्रशंसा होत आहे. आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार असून पुढील तपास सुरू आहे.

सदरची कामगिरी ही राजकुमार शिंदे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ ५, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली धन्यकुमार गोडसे, सहाय्यक पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, मानसिंग पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, काळेपडळ पोलीस स्टेशन, यांचे सुचनेप्रमाणे अमित शेटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पो.हवा. प्रविण काळभोर, दाऊद सय्यद, प्रतिक लाहिगुडे, पो.अं. श्रीकृष्ण खोकले, विशाल ठोंबरे, शाहीद शेख, लक्ष्मण काळे, नितीन शिंदे, अतुल पंधरकर, नितीन ढोले, सद्दाम तांबोळी, प्रदीप बेडीस्कर, महादेव शिंदे यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वाघोलीत एम.डी. ड्रग्जविक्रीवर पोलिसांचा मोठा घाव; दोन आरोपी अटक : ३१ लाख ६ हजार...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे : वाघोली पोलिसांनी एम.डी. (मॅफेड्रॉन) ड्रग्ज विक्री करणाऱ्या टोळीवर कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून एकूण ३१ लाख...

घरगुती गॅसचा काळाबाजार उघडकीस, काळेपडळ पोलिसांची धडक कारवाई : १०३ गॅस सिलेंडरसह एक जण...

0
लोक वार्ता – राज राठोड  पुणे : काळेपडळ पोलीस ठाणे हद्दीत घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या दुकानावर पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत...

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; बिबवेवाडीत धक्कादायक घटना, पतीसह ७ जणांवर गुन्हा दाखल

0
  लोक वार्ता – राज राठोड पुणे : बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सासरच्या छळाला कंटाळून एका विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी...

पुण्यात परिमंडळ-१ मध्ये पोलिसांची धडक तपासणी मोहीम, ब्लॅक स्पॉट, मोकळी मैदाने आणि सार्वजनिक ठिकाणांवर...

0
  लोक वार्ता – राज राठोड पुणे : शहरातील सार्वजनिक सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी परिमंडळ-१ अंतर्गत पोलिसांनी मोठी तपासणी मोहीम राबवत अवैध प्रकारांवर अंकुश आणण्यासाठी ही मोहीम दि. १०...

खोट्या गुन्ह्याचा धाक दाखवून ७ लाखांची खंडणी; पोलीस उपनिरीक्षकासह तिघांवर गुन्हा

0
  लोक वार्ता – राज राठोड पुणे : नामांकित शैक्षणिक संस्थेच्या प्राचार्यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची भीती दाखवून ७ लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला...

error: Content is protected !!