Homeक्राईमलोणी काळभोर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी:अट्टल घरफोडी करणाऱ्या आरोपीला मध्यप्रदेश येथून अटक,६ लाख...

लोणी काळभोर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी:अट्टल घरफोडी करणाऱ्या आरोपीला मध्यप्रदेश येथून अटक,६ लाख ३९ हजाराचा मुद्देमाल जप्त

लोक वार्ता न्यूज – राज राठोड

पुणे: लोणी काळभोर पोलिसांनी एका अट्टल घरफोडी करणाऱ्या आरोपीला मध्य प्रदेशातून अटक करत, चोरीला गेलेला ६ लाख ३९ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करत एक महत्त्वपूर्ण यश मिळवले आहे. हा गुन्हा उघडकीस आणत पोलिसांनी कौतुकास्पद कामगिरी केली आहे.

१२ जुलै २०२५ रोजी फिर्यादी त्यांच्या कुटुंबासह बार्शी येथे गेले होते. १४ जुलै रोजी ते घरी परतले असता, त्यांच्या घराचे कुलूप तुटलेले दिसले. घरातील लोखंडी कपाटाचे लॉक उचकटून त्यातील सोन्याचे दागिने, रोकड आणि मोबाईल फोन चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या घटनेनंतर १५ जुलै २०२५ रोजी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्हा दाखल झाल्यानंतर लोणी काळभोर पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. तपास पथकातील पोलीस अंमलदार पाटील आणि कुदळे यांना गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, पोलिसांनी तांत्रिक पुराव्यांची पडताळणी केली. यातून आरोपीचे नेमके ठिकाण निश्चित करण्यात आले.

तांत्रिक पुराव्यांवरून ही चोरी प्रतिक हिराचंद लिडकर (वय ३१, रा. शिवमंदिर शेजारी रामनगर, खंडवा, ता.जि. खंडवा, मध्य प्रदेश) याने केल्याचे निष्पन्न झाले. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे एक विशेष पथक तात्काळ खंडवा, मध्य प्रदेश येथे रवाना झाले. या पथकाने अत्यंत कौशल्याने आरोपीच्या परिसरातील रहिवाशांकडून माहिती गोळा केली आणि त्याच्यावर पाळत ठेवली. अखेर, २३ जुलै २०२५ रोजी लोणी काळभोर पोलिसांनी सापळा रचून प्रतिक लिडकरला खंडवा येथून ताब्यात घेतले आणि दाखल गुन्ह्यात त्याला अटक केली.

अटक करण्यात आलेल्या प्रतिक लिडकर विरुद्ध मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र राज्यात चोरी, घरफोडी आणि जबरी चोरीसारख्या गंभीर स्वरूपाचे एकूण १५ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे,

आरोपीकडे कसून चौकशी केली असता, त्याने गुन्ह्यात चोरलेले सोन्याचे दागिने, रोकड आणि मोबाईल हँडसेट असा एकूण ६ लाख ३९ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

या कामगिरीमुळे लोणी काळभोर पोलिसांनी एका गंभीर घरफोडीचा केवळ ९ दिवसांत छडा लावला, विशेषतः आरोपी परराज्यातील असतानाही १०० टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यात आले. फिर्यादी यांनी लोणी काळभोर पोलिसांचे आभार मानले.

सदरची उत्कृष्ठ कामगिरी मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ–५ डॉ. राजकुमार शिंदे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग, अनुराधा उदमले यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) स्मिता पाटील, सहा. पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर, पोलीस अंमलदार सातपुते, वणवे, भोसले, माने, जगदाळे, देवीकर, विर, पाटील, कुदळे, कुंभार, गाडे, कर्डीले, सोनवणे, शिरगिरे, दडस, थोरात अमोल जाधव यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वाघोलीत एम.डी. ड्रग्जविक्रीवर पोलिसांचा मोठा घाव; दोन आरोपी अटक : ३१ लाख ६ हजार...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे : वाघोली पोलिसांनी एम.डी. (मॅफेड्रॉन) ड्रग्ज विक्री करणाऱ्या टोळीवर कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून एकूण ३१ लाख...

घरगुती गॅसचा काळाबाजार उघडकीस, काळेपडळ पोलिसांची धडक कारवाई : १०३ गॅस सिलेंडरसह एक जण...

0
लोक वार्ता – राज राठोड  पुणे : काळेपडळ पोलीस ठाणे हद्दीत घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या दुकानावर पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत...

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; बिबवेवाडीत धक्कादायक घटना, पतीसह ७ जणांवर गुन्हा दाखल

0
  लोक वार्ता – राज राठोड पुणे : बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सासरच्या छळाला कंटाळून एका विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी...

पुण्यात परिमंडळ-१ मध्ये पोलिसांची धडक तपासणी मोहीम, ब्लॅक स्पॉट, मोकळी मैदाने आणि सार्वजनिक ठिकाणांवर...

0
  लोक वार्ता – राज राठोड पुणे : शहरातील सार्वजनिक सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी परिमंडळ-१ अंतर्गत पोलिसांनी मोठी तपासणी मोहीम राबवत अवैध प्रकारांवर अंकुश आणण्यासाठी ही मोहीम दि. १०...

खोट्या गुन्ह्याचा धाक दाखवून ७ लाखांची खंडणी; पोलीस उपनिरीक्षकासह तिघांवर गुन्हा

0
  लोक वार्ता – राज राठोड पुणे : नामांकित शैक्षणिक संस्थेच्या प्राचार्यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची भीती दाखवून ७ लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला...

error: Content is protected !!