लोक वार्ता – राज राठोड
पुणे : शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून एका सराईत गुन्हेगाराला गावठी पिस्टल आणि जिवंत काडतुसासह अटक केली आहे. ही कारवाई ७ ऑगस्ट २०२५ रोजी एफ.सी. रोडवरील ज्ञानेश्वर पादुका चौक परिसरात करण्यात आली.
पोलीस अंमलदार सचिन जाधव यांना गुप्त बातमीदारा मार्फत कळाले की, रेकार्डवरील गुन्हेगार अभिषेक राजू टेंकल (वय २३, रा. विष्णुकृपा नगर, शिवाजीनगर) हा दिनदयाळ हॉस्पिटल शेजारील गल्लीत गावठी पिस्टलसह उभा आहे.
ही माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांच्या सूचनेनुसार पोलीस उप-निरीक्षक अजित बडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने दोन पंचांच्या उपस्थितीत सापळा रचला, व बातमीच्या ठिकाणी पोहोचल्यावर आरोपीने पोलिसांना पाहताच पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पथकाने शिताफीने पाठलाग करून त्याला पकडले. पंचांसमक्ष अंगझडती घेतल्यावर त्याच्या कमरेला ३६हजार किमतीचे गावठी पिस्टल व मॅगझीनमध्ये एक जिवंत राऊंड आढळले.
या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक १२४/२०२५, भारतीय हत्यार कायदा कलम ३(२५) व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१) सह १३५ अंतर्गत गुन्हा नोंदवून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी ही मा., अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्री. राजेश बनसोडे मा. पोलीस उप-आयुक्त, परि –१, पुणे शहर, श्री. कृषिकेश रावले, मा. सहा. पोलीस आयुक्त, विश्रामबाग विभाग, पुणे श्री. साईनाथ ठोंबरे यांचे मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. महेश बोळकोटगी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. धनंजय पिंगळे यांचे सुचना प्रमाणे पोलीस उप-निरीक्षक अजित बडे, व पोलीस अंमलदार दिपक चव्हाण, प्रमोद मोहिते, महावीर वलटे, सचिन जाधव, दिपक रोमाडे, इसाक पठाण, कृष्णा सांगवे, सुदाम तायडे यांनी केली आहे.




















