लोक वार्ता – राज राठोड
पुण्यात उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन व्हावे, या लोकहिताच्या मागणीला पतित पावन संघटनेने पाठिंबा दर्शवत पुणे बार असोसिएशनला समर्थन पत्र सुपूर्त केले.
पुण्यात खंडपीठाची स्थापना करण्यासाठी नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण, न्याय प्रक्रियेतील गती आणि लोकशाही बळकट करण्याच्या उद्देशाने पतित पावन संघटनेतर्फे, पुणे बार असोसिएशनच्या अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांना समर्थन पत्र देण्यात आले.
समर्थन पत्र देताना बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲड. समीर भुंडे, माजी पदाधिकारी ॲड. चेतन भुतडा, पतित पावन संघटनेचे शहर उपाध्यक्ष गिरीश काकडे, कामगार कार्याध्यक्ष पियुष वाईकर आणि खडकवासला अध्यक्ष विजय क्षीरसागर उपस्थित होते.

संघटनेच्या प्रतिनिधींनी यावेळी सांगितले की, उच्च न्यायालयाचे खंडपीठ पुण्यात झाल्यास नागरिकांना न्याय मिळवण्यासाठी मुंबईपर्यंत जावे लागणार नाही, त्यामुळे वेळ, खर्च आणि श्रम या तिन्ही बाबींमध्ये मोठी बचत होईल. याशिवाय स्थानिक पातळीवर न्यायप्रविष्ट कामकाज अधिक जलद गतीने पार पडेल.




















