लोक वार्ता –राज राठोड
पुणे : शिक्रापूर परिसरात शनिवारी उशीरा पोलिस व गुन्हेगारांमध्ये झालेल्या थरारक चकमकीत एका अट्टल गुन्हेगाराचा एन्काऊंटर झाला, सोनसाखळी चोरीतील आरोपींना पकडण्यासाठी सातारा पोलिसांचे पथक दाखल झाले होते. सातारा पोलिसांच्या पथकाला शिक्रापूर भागात आरोपींचा माग काढण्यात यश आले होते. तिघे आरोपी संशयितांच्या यादीत होते.
आरोपीला अटक करण्यासाठी आलेल्या पोलिसांवर चाकू हल्ला करून लखन भोसले पळून जाण्याच्या तयारीत होता पोलिसांनी, घटनेचे गांभीर्य पाहून आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला परंतु त्याने धारदार चाकूने पोलिसांवरच हल्ला करायला सुरुवात केले, पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी गोळी झाडली, कारवाईदरम्यान लखन उर्फ महेश पोपट भोसले (रा. वडगाव जयराम स्वामी, ता. खटाव, जि. सातारा) याने एका पोलिस कर्मचाऱ्यावर चाकूने अचानक हल्ला केला.
स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी गोळी झाडली. गोळी आरोपीच्या कमरेत लागली. या घटनेमध्ये दोन पोलीस देखील जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे,
पोलिसांनी जखमी अवस्थेत आरोपीला रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
लखन उर्फ महेश पोपट भोसले , हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर, अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे
या कारवाईदरम्यान आरोपीचे दोन साथीदार मात्र घटनास्थळावरून पसार झाले. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी मोहीम हाती घेतली आहे. या एन्काऊंटरमुळे शिक्रापूर परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये या कारवाईची जोरदार चर्चा सुरू आहे. पोलिसांकडून त्याच्या साथीदारांना लवकरच अटक करण्यात येईल अशी माहिती मिळाली आहे.




















