Homeक्राईमखुनाचा प्रयत्न प्रकरण: भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई, २ आरोपी अटक – आणि...

खुनाचा प्रयत्न प्रकरण: भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई, २ आरोपी अटक – आणि ,२ अल्पवयीन मुले देखील ताब्यात

लोक वार्ता – राज राठोड 

पुणे : ८ सप्टेंबर २०२५ भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका तरुणावर चार ते पाच जणांच्या टोळक्याने कोयत्याने वार करत त्याच गंभीर जखमी केले होते, या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी २ आरोपींना अटक केली आहे, त्याचबरोबर २ अल्पवयीन मुलांना देखील ताब्यात घेतले आहे,

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या खुनाच्या प्रयत्न प्रकरणात पोलिसांनी कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून दोन विधीसंघर्षित बालकांना ताब्यात घेण्यात आले आहे.

दिनांक ०४ सप्टेंबर २०२५ रोजी फिर्यादी यांचा मुलगा हा आपल्या मित्रांसमवेत मोबाईलवर गेम खेळत असताना दोन ते तीन दुचाकीवरून आलेल्या तीन ते चार अनोळखी इसमांनी अचानक हल्ला केला. अज्ञात कारणावरून झालेल्या या हल्ल्यात आरोपींनी फिर्यादीच्या मुलावर धारदार हत्याराने डोक्यात, कानावर आणि हातावर वार करून गंभीर जखमी केले. या घटनेनंतर भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांनी तात्काळ तपास पथकाला सूचना दिल्या. पोलीस उप-निरीक्षक निलेश मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार मितेश चोरमोले, सागर बोरगे व अभिनय चौधरी यांनी घटनास्थळावरील तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. याशिवाय गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांना आरोपींबाबत ठोस धागेदोरे मिळाले.

आरोपींची ओळख व अटक– तपासात या प्रकरणात सहभागी असलेले रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे स्पष्ट झाले.त्यामध्ये –

करण शिवाजी जमादार (वय १९, रा. सिंहगड कॉलेजजवळ, वडगाव बु, पुणे)

शुभम साधु चव्हाण (वय १९, रा. आंबेगाव बु, पुणे)

तसेच त्यांच्यासोबत दोन विधीसंघर्षित बालकांचाही सहभाग आढळून आला. पोलिसांनी ५ सप्टेंबर २०२५ रोजी करण जमादार व शुभम चव्हाण यांना अटक केली तर दोन्ही विधीसंघर्षित बालकांना ताब्यात घेण्यात आले.

या प्रकरणाचा तपास सुरू असून आरोपींना न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. पोलिसांकडून या हल्ल्याचे नेमके कारण व इतर साथीदारांचा शोध घेण्यासाठी तपास अधिक वेगाने सुरु असल्याचे समजते.

या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते; परंतु पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केला आहे.

सदरची कामगिरी मा.अपर पोलीस आयुकत, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ-२, पुणे शहर श्री. मिलींद मोहीते, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे श्री. राहुल आवारे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल खिलारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) जितेंद्र कदम, सहा. पोलीस निरीक्षक मिथुन परदेशी, पोलीस उप-निरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, सागर बोरगे, अभिनय चौधरी, सचिन सरपाले, महेश बारवकर, मंगेश पवार, निलेश खैरमोडे, मंगेश गायकवाड, किरण साबळे, संदीप आगळे, अवधुत जमदाडे व गणेश भोसले यांच्या पथकाने केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

५० लाखांच्या खंडणीसाठी मेट्रो ठेकेदाराचे अपहरण; ५ आरोपी जेरबंद 

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे शहरातील खराडी परिसरात एका मेट्रो ठेकेदाराचे ५० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या प्रकरणात पाच...

वाघोलीत एम.डी. ड्रग्जविक्रीवर पोलिसांचा मोठा घाव; दोन आरोपी अटक : ३१ लाख ६ हजार...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे : वाघोली पोलिसांनी एम.डी. (मॅफेड्रॉन) ड्रग्ज विक्री करणाऱ्या टोळीवर कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून एकूण ३१ लाख...

घरगुती गॅसचा काळाबाजार उघडकीस, काळेपडळ पोलिसांची धडक कारवाई : १०३ गॅस सिलेंडरसह एक जण...

0
लोक वार्ता – राज राठोड  पुणे : काळेपडळ पोलीस ठाणे हद्दीत घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या दुकानावर पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत...

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; बिबवेवाडीत धक्कादायक घटना, पतीसह ७ जणांवर गुन्हा दाखल

0
  लोक वार्ता – राज राठोड पुणे : बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सासरच्या छळाला कंटाळून एका विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी...

पुण्यात परिमंडळ-१ मध्ये पोलिसांची धडक तपासणी मोहीम, ब्लॅक स्पॉट, मोकळी मैदाने आणि सार्वजनिक ठिकाणांवर...

0
  लोक वार्ता – राज राठोड पुणे : शहरातील सार्वजनिक सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी परिमंडळ-१ अंतर्गत पोलिसांनी मोठी तपासणी मोहीम राबवत अवैध प्रकारांवर अंकुश आणण्यासाठी ही मोहीम दि. १०...

error: Content is protected !!