Homeक्राईमफरासखाना पोलिसांनी पकडले गणेश विसर्जन मिरवणुकीतील मोबाईल चोरटे, १लाख ७८ हजार रुपयांचे...

फरासखाना पोलिसांनी पकडले गणेश विसर्जन मिरवणुकीतील मोबाईल चोरटे, १लाख ७८ हजार रुपयांचे १३ फोन जप्त

लोक वार्ता –राज राठोड 

पुणे: गणेश विसर्जन मिरवणुकीच्या गर्दीचा फायदा घेऊन लोकांचे मोबाईल फोन चोरणाऱ्या २ आरोपींना फरासखाना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून १ लाख ७८ हजार रुपये किमतीचे एकूण १३ मोबाईल फोन जप्त केले आहेत.

दिनांक ७ सप्टेंबर रोजी पहाटे अडीच ते साडेतीनच्या सुमारास बेलबाग चौक, लक्ष्मी रोड आणि बुधवार चौक येथे गणेश विसर्जन पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांचे मोबाईल फोन चोरीला गेल्याची तक्रार फरासखाना पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. या घटनेची गांभीर्याने दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांनी तपास पथकाला तात्काळ कारवाईचे आदेश दिले.

तपास अधिकारी महबुब मोकाशी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तपास सुरू केला. पोलीस अंमलदार तानाजी नांगरे आणि गजानन सोनुने यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी पासोड्या विठोबा मंदिराजवळून २ संशयितांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अलीम मुस्ताक शेख (वय २६, रा. गल्ली नं. ६ समोर, अमिन किराणा दुकानाजवळ, मालेगाव, नाशिक) आणि अत्तर अहमद एजाज अहमद (वय २५, रा. मुस्लीम नगर, बी-गल्ली नं. ५, सव्र्व्हे नं. १५९ प्लॉट नं. १६ बडे कब्रस्थान जवळ,मालेगाव, नाशिक) अशी आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून विविध कंपन्यांचे एकूण १३ मोबाईल फोन जप्त केले, ज्यांची एकूण किंमत १,७८,००० रुपये आहे. या कारवाईमुळे अनेक मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांची उकल झाली आहे.

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस उप-आयुक्त, परि-१ पुणे, श्री. कृषिकेश रावले, मा. सहा. पो. आयुक्त फरासखाना विभाग, श्रीमती अनुजा देशमाने यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. प्रशांत भस्मे, पो.नि. (गुन्हे) श्री उत्तम नामवाडे, पो.नि. (गुन्हे) श्री. अजित जाधव, स.पो.नि. वैभव गायकवाड, अरविंद शिंदे, पोलीस उप-निरीक्षक, सहा. पोलीस-उप निरीक्षक महेबुब मोकाशी, कृष्णा निढाळकर तसेच पोलीस अमंलदार तानाजी नांगरे, नितीन तेलंगे, नितीन जाधव, गजानन सोनुने, महेश पवार, चेतन होळकर, महेश राठोड, प्रविण पासलकर, विशाल शिंदे, प्रशांत पालांडे, सुमित खुट्टे, शशीकांत ननावरे, वशिम शेख, म.पो. अंमलदार मनिषा पुकाळे यांच्या पथकाने केलेली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

५० लाखांच्या खंडणीसाठी मेट्रो ठेकेदाराचे अपहरण; ५ आरोपी जेरबंद 

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे शहरातील खराडी परिसरात एका मेट्रो ठेकेदाराचे ५० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या प्रकरणात पाच...

वाघोलीत एम.डी. ड्रग्जविक्रीवर पोलिसांचा मोठा घाव; दोन आरोपी अटक : ३१ लाख ६ हजार...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे : वाघोली पोलिसांनी एम.डी. (मॅफेड्रॉन) ड्रग्ज विक्री करणाऱ्या टोळीवर कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून एकूण ३१ लाख...

घरगुती गॅसचा काळाबाजार उघडकीस, काळेपडळ पोलिसांची धडक कारवाई : १०३ गॅस सिलेंडरसह एक जण...

0
लोक वार्ता – राज राठोड  पुणे : काळेपडळ पोलीस ठाणे हद्दीत घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या दुकानावर पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत...

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; बिबवेवाडीत धक्कादायक घटना, पतीसह ७ जणांवर गुन्हा दाखल

0
  लोक वार्ता – राज राठोड पुणे : बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सासरच्या छळाला कंटाळून एका विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी...

पुण्यात परिमंडळ-१ मध्ये पोलिसांची धडक तपासणी मोहीम, ब्लॅक स्पॉट, मोकळी मैदाने आणि सार्वजनिक ठिकाणांवर...

0
  लोक वार्ता – राज राठोड पुणे : शहरातील सार्वजनिक सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी परिमंडळ-१ अंतर्गत पोलिसांनी मोठी तपासणी मोहीम राबवत अवैध प्रकारांवर अंकुश आणण्यासाठी ही मोहीम दि. १०...

error: Content is protected !!