Homeक्राईमकाळेपडळ पोलिसांची कामगिरी: २लाख ५३हजाराच्या बांधकाम साहित्यासह चोरटा गजाआड,

काळेपडळ पोलिसांची कामगिरी: २लाख ५३हजाराच्या बांधकाम साहित्यासह चोरटा गजाआड,

लोक वार्ता –राज राठोड 

पुणे: काळेपडळ पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने एका बांधकाम साईटवरून अॅल्युमिनियमच्या सेंट्रिंग प्लेटा चोरी करणाऱ्या चोरट्याला अटक करण्यात यश मिळवले आहे. पोलिसांनी आरोपीकडून २ लाख ५३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करत त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

काळेपडळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका बांधकाम साईटवरून अॅल्युमिनियमच्या प्लेटा चोरी झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस अंमलदार अतुल पंधरकर, सद्दाम तांबोळी, आणि शाहीद शेख यांचे पथक नेमण्यात आले होते. या पथकाने तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपीचा शोध सुरू केला. याचदरम्यान, बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी कडनगर चौक, उंड्री येथे एका संशयित इसमास ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने आपले नाव लहू चंद्रकांत लोणार, रा. गोयल गंगाचे प्लॉटमध्ये, महंदवाडी, पुणे असे सांगितले.

चौकशीदरम्यान लहू लोणार उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला, पण सीसीटीव्ही फुटेजमधील आरोपीच्या हालचाली आणि देहबोलीशी त्याची हुबेहूब समानता असल्याने पोलिसांचा संशय बळावला. त्याला काळेपडळ पोलीस ठाण्यात आणून अधिक कसून चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली दिली.

पोलिसांनी त्याच्याकडून एकूण ६१ अॅल्युमिनियमच्या सेंट्रिंग प्लेटा आणि गुन्हा करण्यासाठी वापरलेली टेम्पो गाडी असा एकूण २ लाख ५३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.

सदरची कामगिरी ही राजकुमार शिंदे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ ५, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली धन्यकुमार गोडसे, सहाय्यक पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, मानसिंग पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, काळेपडळ पोलीस स्टेशन, अमर काळंगे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांचे सुचनेप्रमाणे अमित शेटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पो.हवा. प्रविण काळभोर, दाऊद सय्यद, प्रतिक लाहिगुडे, पो.अं. श्रीकृष्ण खोकले, विशाल ठोंबरे, शाहीद शेख, लक्ष्मण काळे, नितीन शिंदे, अतुल पंधरकर, नितीन ढोले, सद्दाम तांबोळी, प्रदीप बेडीस्कर, महादेव शिंदे यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

५० लाखांच्या खंडणीसाठी मेट्रो ठेकेदाराचे अपहरण; ५ आरोपी जेरबंद 

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे शहरातील खराडी परिसरात एका मेट्रो ठेकेदाराचे ५० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या प्रकरणात पाच...

वाघोलीत एम.डी. ड्रग्जविक्रीवर पोलिसांचा मोठा घाव; दोन आरोपी अटक : ३१ लाख ६ हजार...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे : वाघोली पोलिसांनी एम.डी. (मॅफेड्रॉन) ड्रग्ज विक्री करणाऱ्या टोळीवर कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून एकूण ३१ लाख...

घरगुती गॅसचा काळाबाजार उघडकीस, काळेपडळ पोलिसांची धडक कारवाई : १०३ गॅस सिलेंडरसह एक जण...

0
लोक वार्ता – राज राठोड  पुणे : काळेपडळ पोलीस ठाणे हद्दीत घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या दुकानावर पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत...

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; बिबवेवाडीत धक्कादायक घटना, पतीसह ७ जणांवर गुन्हा दाखल

0
  लोक वार्ता – राज राठोड पुणे : बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सासरच्या छळाला कंटाळून एका विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी...

पुण्यात परिमंडळ-१ मध्ये पोलिसांची धडक तपासणी मोहीम, ब्लॅक स्पॉट, मोकळी मैदाने आणि सार्वजनिक ठिकाणांवर...

0
  लोक वार्ता – राज राठोड पुणे : शहरातील सार्वजनिक सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी परिमंडळ-१ अंतर्गत पोलिसांनी मोठी तपासणी मोहीम राबवत अवैध प्रकारांवर अंकुश आणण्यासाठी ही मोहीम दि. १०...

error: Content is protected !!