Homeसामाजिकपुणे,परिमंडळ ४ मधील १० पोलीस स्टेशनांकडे प्राप्त झालेल्या २८लाख ३५ हजार किमतीचे...

पुणे,परिमंडळ ४ मधील १० पोलीस स्टेशनांकडे प्राप्त झालेल्या २८लाख ३५ हजार किमतीचे २०९ हरविलेले मोबाईल नागरिकांना परत

लोक वार्ता –राज राठोड

पुणे: दिनांक २७/११/२०२५ रोजी ११ ते १ वाजताच्या दरम्यान येरवडा पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ४, पुणे शहर यांचे वतीने नागरीकांचे हरविलेले, गहाळ झालेले हस्तगत मोबाईल वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

पोलिसांच्या दक्ष तपास व तांत्रिक साधनांच्या सहाय्याने हस्तगत करण्यात आलेल्या तब्बल २८ लाख ३५ हजार रुपये किमतीच्या २०९ मोबाईल फोनचे वितरण करण्यात आले.

हा विशेष मोबाईल वितरण कार्यक्रम पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ४ यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. यावेळी मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. मनोज पाटील यांच्या हस्ते उपस्थित नागरिकांना त्यांचे मोबाईल परत करण्यात आले.

कार्यक्रमात परिमंडळ ४ मधील १० पोलीस स्टेशनांकडे प्राप्त झालेल्या Central Equipment Identity Register (CEIR) पोर्टलवरील तक्रारी तसेच पुणे शहर पोलीस Lost & Found पोर्टलवरील नोंदींवर आधारित हस्तगत मोबाईल नागरिकांना सुपूर्द करण्यात आले.

मोबाईल परत मिळाल्यावर अनेक नागरिक भावूक झाले. आपल्या भावना व्यक्त करताना नागरिकांनी सांगितले की,
“मोबाईलच्या किंमतीपेक्षा आमच्या भावना अनमोल आहेत. आठवणी, महत्वाचा डेटा आणि अनेकांना जवळच्या व्यक्तींकडून भेट मिळालेला मोबाईल आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. हरविलेला मोबाईल परत मिळेल अशी अपेक्षाच नव्हती. पण पोलीसांनी आम्हाला आमच्या भावना परत मिळवून दिल्या. त्यामुळे पोलिसांवरील आमचा विश्वास आणखी दृढ झाला आहे.”

हरविलेले मोबाईल शोधून काढण्यासाठी पुणे पोलिसांनी सातत्याने तपास, तांत्रिक विश्लेषण, पोर्टलवरील माहितीची पडताळणी व समन्वय साधत केलेल्या प्रयत्नांचे या कार्यक्रमातून दिसून आले. नागरिकांनी संपूर्ण पोलीस दलाचे मनःपूर्वक आभार मानत पोलिसांच्या या उपक्रमाचे कौतुक केले.

सदर कार्यक्रमास मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. मनोज पाटील,, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ४, श्री. सोमय मुंडे, मा. सहा. पोलीस आयुक्त, खडकी विभाग, श्री. विठ्ठल दबडे, मा. सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग श्रीमती प्रांजली सोनवणे, यांच्या सह परिमंडळ ४ मधील १० पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तसेच पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार व मोठ्या संख्येने नागरीक उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वाघोलीत एम.डी. ड्रग्जविक्रीवर पोलिसांचा मोठा घाव; दोन आरोपी अटक : ३१ लाख ६ हजार...

0
  लोक वार्ता – राज राठोड  पुणे : वाघोली पोलिसांनी एम.डी. (मॅफेड्रॉन) ड्रग्ज विक्री करणाऱ्या टोळीवर कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून एकूण ३१ लाख...

घरगुती गॅसचा काळाबाजार उघडकीस, काळेपडळ पोलिसांची धडक कारवाई : १०३ गॅस सिलेंडरसह एक जण...

0
लोक वार्ता – राज राठोड  पुणे : काळेपडळ पोलीस ठाणे हद्दीत घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या दुकानावर पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत...

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; बिबवेवाडीत धक्कादायक घटना, पतीसह ७ जणांवर गुन्हा दाखल

0
  लोक वार्ता – राज राठोड पुणे : बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सासरच्या छळाला कंटाळून एका विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी...

पुण्यात परिमंडळ-१ मध्ये पोलिसांची धडक तपासणी मोहीम, ब्लॅक स्पॉट, मोकळी मैदाने आणि सार्वजनिक ठिकाणांवर...

0
  लोक वार्ता – राज राठोड पुणे : शहरातील सार्वजनिक सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी परिमंडळ-१ अंतर्गत पोलिसांनी मोठी तपासणी मोहीम राबवत अवैध प्रकारांवर अंकुश आणण्यासाठी ही मोहीम दि. १०...

खोट्या गुन्ह्याचा धाक दाखवून ७ लाखांची खंडणी; पोलीस उपनिरीक्षकासह तिघांवर गुन्हा

0
  लोक वार्ता – राज राठोड पुणे : नामांकित शैक्षणिक संस्थेच्या प्राचार्यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची भीती दाखवून ७ लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला...

error: Content is protected !!