लोक वार्ता – राज राठोड
पुणे, २६ जुलै २०२५: अंमली पदार्थ विरोधी पथक १, गुन्हे शाखा, पुणे शहर आणि खराडी पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त कारवाईत मेफेड्रोन (एम.डी.) या अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या २० वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. आरोपीकडून सुमारे ६ लाख २३ हजार ६०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
दि. २६ जुलै रोजी अंमली पदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी आणि अंमलदार हे पुणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत गस्त घालत असताना त्यांना स्वामी समर्थ प्लाझा समोर, थिटे वस्ती, काळुबाई नगर, खराडी येथे एक नंबर प्लेट नसलेली केटीएम मोटारसायकल भरधाव वेगाने रॉंग साईडने येताना दिसली.
या वाहनास तात्काळ थांबवून चौकशी केली असता, संबंधित युवक उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून खालील ऐवज आढळून आला:
२३ ग्रॅम १८ मिग्रॅ. मेफेड्रोन (एम.डी.) अंमली पदार्थ – किंमत अंदाजे ४लाख ६३ हजार,६००
केटीएम मोटारसायकल – किंमत अंदाजे १ लाख
मोबाईल फोन – किंमत ६०हजार
पारदर्शक प्लास्टिकच्या २० रिकाम्या पिशव्या
काळ्या रंगाचे पॉकेट पाऊच
आरोपीचे नाव हर्षवर्धन राहुल धुमाळ (वय २० वर्षे, रा. एकनाथ पठारे वस्ती, चंदननगर, खराडी, पुणे) असे असून त्याच्याविरुद्ध खराडी पोलीस स्टेशनमध्ये गु.र.नं. १५३/२०२५ अन्वये एन.डी.पी.एस. अॅक्टच्या कलम ८(क), २२(ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास सुरू असून आरोपीची पार्श्वभूमी, पुरवठा साखळी आणि सहकार्यांचा शोध घेण्यात येत आहे.
वरील नमुद कारवाई ही मा. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, मा.अपर पोलीस आयुक्त, पंकज देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त, निखील पिंगळे, मा. सहा पो आयुक्त, गुन्हे २ राजेन्द्र मुळीक यांचे मार्गदर्शना खाली अंमली पदार्थ विरोधी पथक, १ गुन्हे शाखा पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे, सहा पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे, पोलीस उप निरीक्षक दिगंबर कोकाटे, पोलीस अंमलदार, संदिप शिर्के, दयानंद तेलंगे, नागनाथ राख, सचिन माळवे, प्रविण उत्तेकर, विशाल दळवी, संदेश काकडे, दत्ताराम जाधव, खराडी पोलीस स्टेशन कडील पोलीस उप निरीक्षक राहुल कोळपे, पोलीस अंमलदार नाणेकर यांनी केली.




















