लोक वार्ता –राज राठोड
पुणे | २६ ऑगस्ट २०२५
पुणे शहरात आगामी गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद उत्सव काळात शांतता, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी हडपसर पोलीस स्टेशन तर्फे दंगा काबू योजना व रूट मार्च घेण्यात आला. हा सराव दिनांक २६ ऑगस्ट रोजी सकाळी १०:५५ ते ११:४० या वेळेत हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पार पडला.

ही मोहीम मा. पोलीस उपआयुक्त परिमंडळ ५ डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मा. सहायक पोलीस आयुक्त हडपसर विभाग श्रीमती अनुराधा उदमले यांच्या देखरेखीखाली राबविण्यात आली. या सरावात वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर श्री. संजय मोगले, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. निलेश जगदाळे आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती अश्विनी जगताप यांनी सक्रिय सहभाग घेतला.
रूट मार्चचा मार्ग: हडपसर गाडीतळ – गांधी चौक – राम मंदिर – पांढरे मळा – नालबंद मस्जिद – मंत्री मार्केट – हडपसर भाजी मंडई – गांधी चौक मार्गे पुन्हा हडपसर पोलीस स्टेशन
या सरावात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडे उपलब्ध साधनसामग्रीचे प्रदर्शन करण्यात आले. तसेच सण-उत्सव काळात नागरिकांचा विश्वास वाढवून पोलीस दल सदैव सज्ज असल्याचा संदेश देण्यात आला.
या दंगा काबू योजना रूट मार्चमध्ये हडपसर पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.




















