लोक वार्ता –राज राठोड
पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या अतिक्रमण व फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात येत आहे. पुणे पोलिसांच्या अतिक्रमणविरोधी व फेरीवालेविरोधी पथकाने, पुणे महानगरपालिकेच्या (PMC) अँटी-हॉकर पथकाच्या मदतीने दुसऱ्या टप्प्यातील मोहिमेला सुरुवात केली आहे.

ही मोहीम सुरू ठेवून रस्त्यांवरील अनावश्यक गर्दी व कोंडी कमी करून, भाविकांच्या सुरक्षिततेसाठी सुरळीत वाहतूक व्यवस्था राखली जाणार आहे. विशेषतः गणपती उत्सवात लाखो नागरिक व भाविक दर्शनासाठी रस्त्यावर उतरतात. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी, धक्काबुक्की किंवा चेंगराचेंगरीसारख्या घटनांना आळा घालण्यासाठी ही कारवाई महत्त्वाची ठरणार आहे.
अतिक्रमण हटविण्याचे काम सातत्याने सुरू राहील आणि गणेशोत्सव पूर्ण होईपर्यंत शहरातील महत्वाच्या मार्गांवर अशी मोहीम राबविली जाणार असल्याची माहिती पोलीस उपआयुक्त परिमंडळ –१ कृषिकेश रावले यांनी सांगितले




















